ऑपरेशन सिंदूरच्या यशानिमित्त देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम ८ मे रोजी काव्यरत्नावली चौकात आयोजन; वीर जवानांना सलाम

बातमी शेअर करा...

ऑपरेशन सिंदूरच्या यशानिमित्त देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम
८ मे रोजी काव्यरत्नावली चौकात आयोजन; वीर जवानांना सलाम

जळगाव (प्रतिनिधी) – भारतीय सैन्य दलाने अलीकडेच अतिरेक्यांविरुद्ध यशस्वीपणे पार पाडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेच्या गौरवार्थ जळगावमध्ये देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार, ८ मे २०२५ रोजी सायंकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत काव्यरत्नावली चौकात हा कार्यक्रम पार पडणार आहे.

हा कार्यक्रम भंवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, युवाशक्ती फाऊंडेशन व रमेश पहेलानी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येत असून, कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून भारतीय जवानांच्या शौर्याला अभिवादन करण्यात येणार आहे.

जळगावकरांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून वीर जवानांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया यांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम