
ऑर्केस्ट्रा कलावंतांवर अन्याय ; न्याय मिळावा , हक्काच्या जागेसाठी लढा उभारणार….!
ऑर्केस्ट्रा कलावंतांवर अन्याय ; न्याय मिळावा , हक्काच्या जागेसाठी लढा उभारणार….!
जळगाव :- शहरातील ऑर्केस्ट्रा क्षेत्रातील नामवंत मंडळी एका प्रसंगी एकत्र आली होती. त्यावेळी जळगाव शहरात ऑर्केस्ट्रा कलाकारांवर होणारा अन्याय उदा. हॉल न मिळणे,कार्यक्रमाची प्रसिद्धी न मिळणे,कल्याणकारी योजना राबविणे,प्रसिद्ध बालगंधर्व नाट्यगृह दुरुस्ती करून कलावंतांना नाममात्र दरात उपलब्ध होणे यासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली आणि एकमताने ह्यावर विचार विनिमय करण्यासाठी जळगाव शहरातील सर्व कलाकारांची बैठक अथांग फार्म हाऊस, शिरसोली रोड येथे जेष्ठ कलावंत,गायक मोहनदादा तायडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली..प्रास्ताविक विजयकुमार कोसोदे यांनी तर बैठकीचे सूत्रसंचालन तुषार वाघुळदे यांनी केले.
जिल्ह्यातील ऑर्केस्ट्रा कलावंत अनेक
अडचणींना तोंड देत आहेत,
यामुळे अनेक कलावंत आर्थिक संकटात सापडले आहेत आणि
त्यांना उपासमारीची भीती वाटत आहे. सरकारने मदताचा हात देऊन
जगण्यासाठी उभारी द्यावी, अशी अपेक्षा ऑर्केस्ट्रा
कलाकारांनी बैठकीत व्यक्त केली आहे. कष्टकरी तसेच अल्प
उत्पन्न गटातील नागरिकांसाठी सरकारने पॅकेज
जाहीर केले आहे. मात्र, असंघटित कलाकारांची अजिबात
दखलसुद्धा घेतली जात नसल्याची खंत जेष्ठ कलावंत विजयकुमार कोसोदे,दिनेश गोयर ,सलमान शाह यांनी आदींनी व्यक्त केली. मंगल कार्यालये , सभागृहधारक हॉल मध्ये ऑर्केस्ट्रा कलाकारांना बंदी आणतात..यात भागवत पाटील ,कांचन तायडे,जगदिश बिंद्रा, संदीप सोनार,युवराज सोनवणे, रतनकुमार थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. मागील वर्षी कमाईच न झाल्याने अनेकांना
नैराश्य देखील आले. मात्र, त्यांच्यावरच ही वेळ आल्याची जाणीव
कुणालाही नाही. कलाकारावर एक प्रकारचा ” घाला ” घालण्याचे काम शासन व इतर लोकांकडून होत आहे ,याबद्दल जेष्ठ कलाकार मोहन तायडे आणि संजय सुर्यवंशी यांनी नाराजी व्यक्त केली.
हातावर पोट
असणारे वादक, मदतनीस आणि इतर सहकारी यांचे हाल होत आहेत .हातावर पोट असणाऱ्या
कलाकारांना उदरनिर्वाह कसा करायचा याची चिंता
भेडसावते आहे.
प्रेक्षकांचे ‘मनोरंजन ही लास्ट प्रायोरिटी’ असते,हे आधी गांभीर्याने लक्षात घ्यायला हवे.
कलाकारांना कोणीही वाली नाही. इतर क्षेत्रांप्रमाणे
शाखा, संघटना नसल्याने त्यांच्या व्यथांना वाचा व जगण्यासाठी
.सरकारने
कलाकारांच्या प्रश्नांची वेळेत दखल घ्यावी..- ऑर्केस्ट्रा कलावंतांच्या हितासाठी पेन्शन योजना सुरू
करण्यात यावी. खान्देशातील कलावंतांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वतंत्र घरकुल योजना देण्यात यावी. कलावंतांसाठी कल्याणकारी योजना सुरू करण्यात याव, खान्देशातील आर्केस्ट्रा कलावंतांच्या समस्यांसाठी
एकजुटीने लढा देण्याचा विश्वास यावेळी तुषार वाघुळदे यांनी व्यक्त .हॉटेल रॉयल पलेसचे प्रदीप आहुजा यांनी कलावंतांसाठी हक्काची जागा कशी उपलब्ध करता येईल तसेच न्याय देण्याबाबत सकारात्मक माहिती दिली.जिल्ह्यातील कलाकारांनी एकजूट तयार करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. या बैठकीस विजयकुमार कोसोदे, मोहनदादा तायडे,
, कांचन तायडे, , निलेश पाटील, अशोक मालुसरे, दिनेश गोयर, सरदार तडवी, अजित भालेराव, जहूर पहेलवान, भागवत पाटील ,भगवंत फडणीस, प्रकाश सोनवणे, जगदीशचंद्र बिंद्रा, प्रभाकर जाधव, संजय सूर्यवंशी, संजय दुसाने,प्रमोद जोशी, कपिल घुगे, संघपाल तायडे, उद्योगपती प्रदीप आहूजा, युवराज सोनवणे,रमेश गोयर, आर. डी. पाटील, रमेश पहलानी, नितीन सूर्यवंशी, सतीश बाटुंगे ,रवी गोपाळ, सुनील सरदार, राजेंद्र सराफ ,सोमनाथ पाटील, अशोक सनेर ,सलमान शाह, हेमंत बारी, अशोक भावसार ,संदीप सोनार, राजेंद्र घुगे पाटील, भूषण वंजारी,सुभाष मिस्त्री, सौ. अनिता नेमाने, सौ. जयश्री धर्माधिकारी, अथांग फार्म च्या संचालिका सौ. लीला कोसोदे. यांच्यासह अनेक कला-संगीत क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम