
ओंकारेश्वर मंदिरात उद्या महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम
ओंकारेश्वर मंदिरात उद्या महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम
पहाटे चार वाजता दर्शनासाठी मंदिर उघडणार
जळगाव : श्री ओकारेश्वर मंदिरात उद्या महाशिवरात्री महोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रम होणार असून मंदिर परीसर सुशोभित करण्यात आला आहे.
पहाटे ४ वाजता दर्शनार्थ मंदिर उघडण्यात येणार असून संपूर्ण दिवस शिवअभिषेक पूजनाचा कार्यक्रम होईल. पहाटे ५ ते ७. द्वितीय पर्व १० ते १२, तृतीय पर्व दुपारी ४ ते ६ प्रदोषकाल, प्रथम पर्व रात्री ७ ते ९, द्वितीय पर्व रात्री १० ते १२, तृतीय पर्व रात्री १ ते ३, चतुर्थ पर्व पहाटे ४ ते ६ अशा ७ विशेष पर्वामध्ये शिव अभिषेक पूजनाचा विशेष कार्यक्रम होणार आहे.
दुपारी १२ वाजता अभिजित मुहूर्ताला, सायंकाळी गोरज मुहूर्ताला ६ वाजता १०८ निरंजन्याद्वारे महाआरती होईल. रायपूर येथील उद्योगपती व छत्तीसगड राज्याचे पारीख समाजाचे अध्यक्ष मुकेश पारीख व परभणी सुजीत जोशी यांच्या हस्ते अभिषेक होईल. मंदिर व परीसरात विद्युत रोषणाई केली आहे. संध्याकाळी ७ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत श्री सत्संग भजन मंडळाकडून शिवभजन होईल.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम