ओझोन दिनानिमित्त इको क्लबतर्फे संत ज्ञानेश्वर विद्यालयात ऑक्सिजन पार्कची निर्मिती

बातमी शेअर करा...

ओझोन दिनानिमित्त इको क्लबतर्फे संत ज्ञानेश्वर विद्यालयात ऑक्सिजन पार्कची निर्मिती
जळगाव प्रतिनिधी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये ओझोन दिनानिमित्त इको क्लब व विज्ञान मंडळाकडून उपशिक्षिका साधना शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्सीजन पार्क ची निर्मिती करण्यात आली. संत ज्ञानेश्वर विद्यालय मध्ये नवीन उपक्रम राबवणे सर्वश्रुत आहे,
पण शाळेचे वैभव वाढवण्यासाठी शाळेतील सर्वच शिक्षक सर्वतोपरी प्रयत्न करतात. शाळेत प्राणवायूची उत्पादक क्षमता वाढवणारे
ऑक्सिजन पार्कचे साठी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भाऊ नाईक यांनी सहकार्य केले . विज्ञान मंडळाच्या सदस्यांना पीपीटी द्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
तुळशीलाही अत्यंत महत्त्वाचे स्थान असून तुळस आणि ऑक्सिजनचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, म्हणून ‘ऑक्सिजन पार्क’ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या माध्यमातून विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व कळेल.असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम