
ओबीसी महामंडळाच्या थकित कर्ज प्रकरणात थकित व्याजावर ५० टक्के सवलत
ओबीसी महामंडळाच्या थकित कर्ज प्रकरणात थकित व्याजावर ५० टक्के सवलत
जळगाव, दि. २८ ऑगस्ट,–“ओबीसी महामंडळाच्या थकित कर्ज प्रकरणांत संपूर्ण कर्ज रक्कमेच्या एकरकमी भरण करणा-या लाभार्थिस थकित व्याज रक्कमेत ५० टक्के सवलत देण्याबाबतची एकरकमी परतावा (ots) रावाविण्यात येत आहे. त्यानुसार, महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थीनी सदर योजनेचा लाभ घेऊन कर्ज मुक्त व्हावे”
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. मुल यांचे जिल्हा कार्यालय जळगांव यांचे मार्फत विविध कर्ज योजनेतर्गत जळगाव जिल्हयातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थीना कर्ज परतफेडीसाठी विहित मुदत देण्यात येते. विहित मुदत संपूर्ण गेली असताना थकित कर्ज वसुलीसाठी सर्व वैधानिक प्रयत्न महामंडळाकडुन करण्यात येत आहेत.
याकरीता, महामंडळाच्या थकित लाभार्थीसाठी संपुण थकित कर्ज रक्मेच्या एकरकमी भरणा करणा-या लाभार्थीस थकित व्याज रकमेत ५० टक्के सवलत देण्याची सुधारीत एकरकमी परतावा (ots) योजना नव्याने राबविण्यात येत आहे. या योजनेत (एक रककमी परतावा – ots) लाभ घेऊन सर्व संबधित लाभार्थीनी थकित मुददल व्याज रक्कम एकरकमी भरणा करून कर्ज खाते बंद करुन कर्ज मुक्त व्हावे व भविष्यात होणारी संभावित कायदेशिर कार्यवाही टाळावी, असे आवाहन मा. जिल्ह व्यवस्थापक, जळगांव यांनी केले आहे.
अधिक माहिती साठी कार्यालयाचा पत्ता :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ लि. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ कॉलनी, पहिला मजला, महाबळ रोड, सैनिक हॉल च्या पाठीमागे, जि. जळगांव फोन नं. ०२५७-२२६१९१८

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम