ओरियन इंग्लिश मीडियम स्कुलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात
विविध कलाविष्कार सादर
ओरियन इंग्लिश मीडियम स्कुलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात
विविध कलाविष्कार सादर
जळगाव प्रतिनिधी
के.सी.ई.सोसायटीच्या ओरियन इंग्लिश मिडियम स्टेट बोर्ड स्कूल येथे ‘परंपरा – संस्कृती से समृध्दी कि ओर’ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सांस्कृतिक सोहळा दिवस ,पहिल्या दिवशी नर्सरी ते चौथी पर्यंतच्या चिमुकल्यानी रेट्रो टू मेट्रो या संकल्पने अंतर्गत विविध कलाविष्कार सादर केले. त्यामध्ये राजेश खन्ना ट्रिब्यूट आणि कृष्णलीला डान्स यांनी प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.या शुभप्रसंगी मुख्य अतिथी विकास पाटील (शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग, जळगाव) लाभले. तर गेस्ट ऑफ ऑनर अॅड.प्रमोद एन.पाटील (सचिव,खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी), प्राचार्य डॉ.अशोक राणे (के.सी.ई बी.एड कॉलेज),युवराज राणे (वित्त अधिकारी, के.सी.ई सोसायटी,)गोकुळ पाटील (व्यवस्थापक, के.सी.ई सोसायटी)पी.सी.चौधरी (विधी सल्लागार)अमोल देशमुख (संचालक, मनभावन रेडिओ),संजीवकुमार पाटील (रेक्टर,गर्ल्स हॉस्टेल), प्राचार्य श्रीधर सुनकरी (ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूल), उप प्राचार्या रजनी गोजोरेकर (,ओरियन इंग्लिश मिडियम स्टेट बोर्ड स्कूल) सर्व पालक ,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
सांस्कृतिक सोहळा दुसरा दिवस या दिवशी पाचवी ते नववी पर्यंत च्या विद्यार्थ्यांनी जगाच्या उत्पत्तीपासुन तर आधुनिक (ए.आय) युगापर्यंतचा प्रवास नृत्याविष्कारातून सादर केला. तसेच विशेष नृत्य टॉर्च डान्स इयत्ता ७वी आणि ८ वी च्या विद्यार्थ्यांनी तर इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी युनिटी डान्स सादर करून प्रेक्षकांच्या टाळ्यांची दाद मिळवली.पारितोषिक वितरण सोहळा यानिमित्ताने विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये गौरी ज्ञानेश्वर दहाडदे,सलोनी ज्ञानेश्वर घुगे,यश हेमराज झटके,डिंपल विनायक चौधरी,हर्षवर्धन महेंद्र बढे, तूषीता आकाश सराफ,दिशा सुभाष बाविस्कर यावेळी प्रमुख अतिथिंच्या व मान्यवरांच्या हस्ते वरील सर्व विद्यार्थ्यांचा पालकांसोबत सन्मान करण्यात आला. तसेच स्कूलला एकलव्य क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या क्रीडा महोत्सव २०२५ येथील चषक तसेच ब्लूम बर्ड तर्फे राज्यातून बेस्ट स्कूल अवार्ड ने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.या शुभप्रसंगी मुख्य अतिथी अॅड.प्रविणचंद्र ई.जंगले (सहसचिव),डॉ.अशोक राणे,युवराज राणे,गोकुळ पाटील,पी.सी.चौधरी,सुषमा कंची,डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर (प्रशासक अधिकारी, एकलव्य क्रीडा संकुल),अमोल देशमुख,संदीप केदार (जनसंपर्क अधिकारी),संजीवकुमार पाटील,परिमल मोदी (व्यवस्थापक, ब्लूम बर्ड), प्राचार्य श्रीधर सुनकरी ,उपप्राचार्य रजनी गोजोरेकर सर्व पालक,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद पाटील,सिध्देश्वर पाटील,अंजली वर्मा,प्रिती बत्तिसे यांनी केले. तर उपप्राचार्या रजनी गोजोरेकर यांनी आभार मानले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम