ओरियन सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी रंगमंचावर प्रेक्षकांना प्रयागराज तीर्थक्षेत्राचे घडविले दर्शन..
विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम केले सादर
ओरियन सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी रंगमंचावर प्रेक्षकांना प्रयागराज तीर्थक्षेत्राचे घडविले दर्शन..
विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम केले सादर
जळगाव प्रतिनिधी
खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन दुसऱ्या दिवशी देखील उत्साहात पार पडले. यावेळी इयत्ता तिसरी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉ.विजय लक्ष्मीनारायण माहेश्वरी कुलगुरू कवयित्री बहिणाबाई नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडोकेट प्रकाश बी. पाटील
व्हाइस प्रेसिडेंट के सी ई सोसायटी होते. ॲडव्होकेट प्रमोद एन. पाटील सेक्रेटरी केसीई सोसायटी, डी. टी.पाटील ट्रेझरर ऑफ केसीई सोसायटी, प्रवीणचंद जंगले जॉइंट सेक्रेटरी केसीई सोसायटी, डॉ. अशोक राणे प्रिन्सिपल बीएड कॉलेज आणि मेंबर मॅनेजिंग कौन्सिल ऑफ केसीई सोसायटी, डॉ अंकश्री बेंडाळे, श्री.शशिकांत वडोदकर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर केसीई सोसायटी तसेच विविध सीबीएसई स्कूलचे प्रिन्सिपल उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमांमध्ये बक्षीस वितरण समारंभ देखील पार पडला यामध्ये इयत्ता दहावीतील धवल प्रफुल्ल पाटील आणि समृद्धी विष्णू वानखेडे व बारावीतील पलक हेमंत चिरमाडे आणि चिन्मय ललित तावडे या गुणवंत विद्यार्थ्यांना डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे पारितोषिक आणि श्रीमती ज्योती बेंडाळे यांच्या स्मरणार्थ सुवर्णपदक व रजत पदक देऊन गौरविण्यात आले . त्याचबरोबर विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.त्याचबरोबर
सोसायटीने आयोजित केलेल्या क्रीडा महोत्सवात स्कूलच्या विद्यार्थ्यांना चॅम्पियन ट्रॉफी मिळाली या विद्यार्थ्यांचा व क्रीडा शिक्षकांचा देखील सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आला. त्याचबरोबर संगीत विभागाने देखील वर्षभरात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
अशा तऱ्हेने सांस्कृतिक कुंभमेळ्याला सुरुवात झाली . कुंभमेळा शोभायात्रा मध्ये भगवान शिवशंकर त्याचप्रमाणे अघोरी योगी आणि गण यांचे विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद सादरीकरण केले. शिव आणि शिव महिमा तसेच आदिशक्तीचे विविध रूपे, बिहू नृत्य, योगा डेमॉन्स्ट्रेशन, कराटे डेमॉन्स्ट्रेशन, मल्लखांब, आई आणि मुलांमधील भावनिक नातेसंबंध त्याचबरोबर नवीन जुन्या गाण्यांवर आधारित नृत्यप्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले . अतिशय कमी दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे सादरीकरण केले . अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांच्या दूरदर्शी धोरणातूनच शिक्षकांना वेळोवेळी कल्पकतेने कार्य करण्याची प्रेरणा मिळत असते. कल्पनेतून साकारलेली मूर्त रूपे सादर करण्यासाठी स्कूलच्या प्राचार्या सौ. सुषमा कंची यांचे मार्गदर्शन अनमोल ठरले. उपप्राचार्या सौ.मेघना राजकोटिया यांच्या सहकार्याने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला . आभार प्रदर्शन आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम