कँटीन ठेकेदार असल्याचे सांगत व्यापाऱ्याला सव्वा लाखांचा गंडा

बातमी शेअर करा...

कँटीन ठेकेदार असल्याचे सांगत व्यापाऱ्याला सव्वा लाखांचा गंडा

जळगाव प्रतिनिधी कँटीनचा ठेकेदारअसल्याचा बहाणा करून जळगावातील व्यापाऱ्याची तब्बल १ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच, मालाचे पैसे मागितल्यावर संबंधित व्यापाऱ्याला धमकावल्याचाही गंभीर आरोप आहे.

दाणाबाजार परिसरातील ५१ वर्षीय व्यापाऱ्याला २ जून रोजी सारंग देशपांडे (रा. नाशिक) या व्यक्तीने फोन करून संपर्क साधला. देशपांडे याने स्वतःला एका कंपनीच्या कँटीनचा ठेकेदार असल्याचे खोटे सांगत व्यापाऱ्याचा विश्वास संपादन केला. त्याच दिवशी त्याने ठरवलेले ट्रान्सपोर्ट वाहन चालकासह दाणा बाजार येथील दुकानावर पाठवले.

या वाहनाद्वारे आरोपीने गहू, तांदूळ, तूर दाळ आणि मूग दाळ असे एकूण १ लाख १७ हजार रुपयांहून अधिक किमतीचे धान्य दुकानातून उचलले. मात्र, माल घेतल्यानंतर पैसे देण्याची वेळ येताच सारंग देशपांडे सातत्याने टाळाटाळ करू लागला. व्यापाऱ्याने वारंवार पैसे मागितल्यावर त्याला उलट धमकावण्यात आले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

या प्रकरणी व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून जळगाव शहर पोलिस ठाण्यात सारंग देशपांडेविरुद्ध फसवणूक व धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम