
कंडारीत १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या
कंडारीत १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव : तालुक्यातील कंडारी शिवारात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. मृत मुलीचे नाव सावित्री गुरीलाल भिलाला (वय १६) असून ती मूळची मध्यप्रदेशातील रहिवासी आहे.
सावित्री काही दिवसांपासून कंडारी येथे आपल्या नातेवाईकांकडे वास्तव्यास होती. प्राथमिक माहितीनुसार ती गतीमंद होती व तिच्यावर उपचार सुरू होते. या कारणामुळे तिने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
सोमवारी नातेवाईक शेतातून परतल्यावर घरात सावित्री गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम