कजगावमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

बातमी शेअर करा...

कजगावमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

 

 

डीजेच्या गजरात मिरवणूक; भाविकांची मोठी गर्दी

 

कजगाव (ता. भडगाव): येथील चाळीसगाव रस्त्यावरील प्रसिद्ध ऋषीबाबा मंदिर परिसरात श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. १० ऑगस्ट रोजी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सोहळ्याच्या आदल्या दिवशी, म्हणजेच ९ ऑगस्ट रोजी, सावता माळी चौकातील हनुमान मंदिरातून मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. सजवलेल्या बैलगाडीतून, डीजेच्या गजरात ही मिरवणूक सावता माळी चौक, नागद रोड, बसस्थानक चौक आणि चाळीसगाव रस्त्यावरून ऋषीबाबा मंदिर परिसरात पोहोचली.

१० ऑगस्ट रोजी येथे विधीवत पूजा-अर्चा करून श्री हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यासाठी कजगावसह आजूबाजूच्या परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम