
कजगाव येथे श्री संत सेना शिरोमणी महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी
कजगाव येथे श्री संत सेना शिरोमणी महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी
कजगाव : कजगाव येथे श्री संत सेना शिरोमणी महाराज यांची पुण्यतिथी दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी बुधवारमोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी धनंजय रवींद्र निकम यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजन पार पडले.
या प्रसंगी जळगाव जिल्ह्याचे माजी शिक्षण सभापती आदरणीय एकनाथ गरड महाजन यांनी मंदिरात संत सेनेश्वर महाराजांच्या मूर्तीची पूजाअर्चा करून आदरांजली वाहिली. सरपंच पुत्र अनिल महाजन यांनी मंदिर परिसरात मुरूम टाकून जमीन समतल करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाला उपस्थितीत माजी सरपंच पती दिनेश राजपूत, माजी पंचायत समिती सदस्य अशोक सोनवणे, विक्रम महाजन तसेच गावातील ग्रामस्थ, समाज बांधव आणि नाभिक समाज बांधवांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कजगाव येथील नाभिक बांधवांनी पुण्यतिथी निमित्ताने एकत्रित वर्गणी गोळा करून सहभोजनाचा आनंद घेतला.
भडगाव कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास वाघ यांनी संत सेनेश्वर महाराजांच्या जीवनचरित्राविषयी उपस्थितांना माहिती दिली. विविध कार्यकारी सहकारी सोसायटी संचालक हिलाल वाघ यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले. तरुण कार्यकर्ते सुनिल जगताप व अभिलाष वाघ यांनी वर्गणी गोळा करून समाजातील बांधवांना कार्यक्रमासाठी प्रेरित केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर वाघ, प्रकाश वाघ, अमोल जगताप, योगेश वाघ, अविनाश वाघ, दिनेश सोनवणे, धनंजय सोनवणे, किरण जगताप, सुकलाल नेरपगार, सुरेश नेरपगार, अशोक सूर्यवंशी, आबा महाले, संतोष चव्हाण, रवींद्र निकम, प्रशांत वाघ, दीपक सोनवणे, अशोक सोनवणे, कैलास महाले, कुणाल सोनवणे, प्रशांत सोनवणे यांच्यासह परिसरातील नाभिक समाज बांधवांनी मोठे परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे पुण्यतिथी सोहळा भक्तिभावात यशस्वीरीत्या पार पडला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम