कडीकोयंडा तोडून चोरटयांनी लांबविला ७३ हजारांचा ऐवज

जळगाव शहरातील घटना ; चोरट्यांविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा...

कडीकोयंडा तोडून चोरटयांनी लांबविला ७३ हजारांचा ऐवज

जळगाव शहरातील घटना ; चोरट्यांविरुद्ध गुन्हा
जळगाव I प्रतिनिधी

डॉक्टर दाम्पत्य रुग्णालयात असताना त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी डल्ला मारला. याठिकाणाहून चोरट्यांनी रोख आठ हजार रुपयांसह सोने-चांदीचे दागिने, घड्याळ असा एकूण ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना दि. १३ जानेवारी रोजी यशवंत कॉलनीमध्ये घडली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील यशवंत नगरात डॉ. समीर रमाकांत सोनार हे वास्तव्यास आहे. त्यांचे सोनोग्राफी केंद्र

असून ते व त्यांच्या डॉक्टर पत्नी या नेहमीप्रमाणे दि. १३ जानेवारी रोजी सोनोग्राफी केंद्रात होते. त्या वेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातून रोख ८ हजार रुपये, १० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, २० हजार रुपये किमतीच्या ६ मनगटी घड्याळ असा एकूण ७३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. दुपारी डॉ. सोनार यांच्या पत्नी घरी गेल्या त्या वेळी ही चोरी लक्षात आली

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम