
करियर कट्टा उपक्रम: गो. से. महाविद्यालय महाराष्ट्रातून चौथ्या क्रमांकावर
मुंबई येथे राज्यस्तरीय बक्षीस वितरण सोहळा
करियर कट्टा उपक्रम: गो. से. महाविद्यालय महाराष्ट्रातून चौथ्या क्रमांकावर
मुंबई येथे राज्यस्तरीय बक्षीस वितरण सोहळा
खामगाव:प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला करिअर कट्टा हा उपक्रम या उपक्रमाचा 2024 मधील राज्यस्तरीय बक्षीस वितरण सोहळा 25 फेब्रुवारी 2025 रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे पार पडला. सदर बक्षीस वितरण कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदयसामंत उपस्थित होते.
2024 चा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार विद्या प्रतिष्ठान बारामती तर दुसरा क्रमांक तायवाडे कॉलेज कोराडी यांना मिळाला.तिसऱ्या क्रमांकावर एम जे कॉलेज जळगाव असून गोसे महाविद्यालय खामगाव ने आपले राज्य स्तरावरील चौथे स्थान कायम ठेवण्यात यश मिळविले.
2023 मध्ये सुद्धा गोसे महाविद्यालय राज्यघरामधून करिअर कट्टा उपक्रमामध्ये चौथ्या क्रमांकावर होते. सदर पुरस्कार यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदय जी सामंत यांचे हस्ते गोसे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ धनंजय तळवणकर व बुलढाणा जिल्हा करिअर कट्टा समन्वयक डॉ विद्याधर आठवर यांनी स्वीकारला. ह्यावेळी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष सन्माननीय यशवंत शितोळे, स्किल कौन्सिल सेक्टरचे संचालक प्रफुल्ल पाठक, सिंघानिया इंडस्ट्रीजचे शंकर जाधव, सुप्रसिद्ध व्हाईस थेरेपिस्ट डॉ सोनाली लोहार, अमेरिकेमध्ये स्थित असलेले गरजे महाराष्ट्र चे संचालक अनंत गानू आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान साहित्या केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उद्योजकता विकास पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण असे अनेकविध उपक्रम चालविले जातात त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग व महाविद्यालयाचे अथक प्रयत्न यांचा तपशील गोळा करून दरवर्षी महाविद्यालयीन स्पर्धा आयोजित केल्या जातात.
याचा फायदा आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे याकरिता प्राचार्य डॉ धनंजय तळवणकर सतत प्रयत्नशील असतात त्याचा ठसा राज्यस्तरावर सुद्धा उमटलेला आपल्याला या पुरस्कारामधून दिसतो. सदर पुरस्कार मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचामध्ये नवीन उपलब्ध जोडल्या गेली असल्यामुळे विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुभाष बोबडे, सचिव डॉ. प्रशांत बोबडे सर्व संचालक मंडळ व खामगाव नगरवासीयांकडून महाविद्यालयाचे अभिनंदन केल्या जात आहे. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागिब देशमुख यांनी दिली आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम