कर्करुग्णाच्या उपचारासाठी PM रिलीफ फंडातून 2.5 लाखांची मदत
केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी केली गरीब रुग्णास मदत
कर्करुग्णाच्या उपचारासाठी PM रिलीफ फंडातून 2.5 लाखांची मदत
केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी केली गरीब रुग्णास मदत
सावदा l प्रतिनिधी
मोठा वाघोदा येथील मो.आसिफ मो ताहीर यांना कर्करोगाच्या उपचारासाठी केंद्रीय राज्यमंत्री खासदार रक्षाताई खडसे यांनी 2.5 लाख रुपये पि एम रीलीफ फंडातून त्वरित मंजुर करून दिले.
अंत्यंत गरीब परीस्थिती असणारे मो आसिफ यांना कर्करोगाने पछाडले असता त्यांना कुठुन ही मदत मिळाली नाही. त्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ च्या जिल्हा संयोजिका
सारीका चव्हाण यांच्या कडे संपर्क साधला असता हा सर्व विषय त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री खासदार रक्षाताई खडसे यांना सांगितले त्यांनी तात्काळ PMO कार्यालयाशी संपर्क साधुन
PM रीलीफ फंडातून त्वरीत 2.5 लाख रुपये मिळवून दिले. ताईंचे स्वियसाह्यक तुषार राणे, कार्यालयीन व्यवस्थापक गणेश भाऊ कोळी यांनी लगेच कागदपत्रांची पूर्तता केली.
त्याबद्दल मो आसिफ मो ताहीर यांच्या परीवाराने खासदार रक्षाताई खडसे, तुषार राणे, गणेश कोळी व सारीका चव्हाण यांचे आभार मानले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम