रावेर – विजय पाटील
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की आरटीओ नाक्यावर आरटीओ विभागातर्फे वाहनांची कडक तपासणी सुरू असून तपासणी दरम्यान आरटीओ अधिकाऱ्यांनी सुमारे चार लाखाची रोकड जप्त केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने व प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोटर वाहन निरीक्षक सौरभ पाटील, मोटर वाहन निरीक्षक निर्मला वसावे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक राहुल काळे, सहायक मोटर वाहन निरीक्षक ऋषिकेश सातपुते हे सर्व वाहनांची काटेकोरपणे तपासणी करत आहे. या तपासणी दरम्यान एम.पी. ६८ सी. २३७८ हि गाडी तपासणी केली असता या गाडीत चार लाख दहा हजार रुपयांची रोकड आढळून आली. या गाडीतील मगन केतन जांभळकर रा. लालबाग कोयला गेट समोर, ब-हाणपूर, मध्य प्रदेश व जयेश पंडित चौधरी, रा. आडगाव, जिल्हा ब-हाणपूर, मध्य प्रदेश यांची चौकशी करून रकमे बाबत विचारले असता त्यांना समाधानकारक उत्तरे व पुरावे देता आली नाहीत. म्हणून रक्कम जप्त करून एसएसटी पथकाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. पुढील कारवाई महसूल विभाग व पोलीस विभाग हे करीत आहे.
प्रतिक्रिया
मध्य प्रदेशातून मुक्ताईनगर मार्गे महारष्ट्रात अवैध वाहतूक तसेच मोटार वाहन कायद्या अंतर्गत नेहमीच तपासणी करीत असतो मात्र निवडणूक काळात आदर्श आचारसंहिता राबविण्याकरिता पैशांची तस्करी, अवैध मद्य वाहतुक, मतदारांसाठी प्रलोभन बाबत कडक तपासणी करीत असून चोख बंदोबस्त ठेवला आहे.
सौरभ पाटील , मोटार वाहन निरीक्षक
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम