कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या 

बातमी शेअर करा...

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या 

जळगाव तालुक्यातील वडली येथील घटना

जळगाव : डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढल्याने तणावात असलेल्या गणेश अशोक पाटील (४३, रा. वडली, ता. जळगाव) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (२ जून) दुपारी वडली येथे घडली. गणेश पाटील हे शेती काम करायचे. शेतीसाठी त्यांनी कर्ज घेतलेले होते, ते कसे फेडावे

या विवंचने ते होते.

सोमवारी दुपारी त्यांची पत्नी बाहेर असताना घरात एकटेच असलेल्या गणेश यांनी गळफास घेतला. पत्नी घरात आली त्यावेळी पतीने गळफास घेतलेला होता. गणेश यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. मयताच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम