कर्तव्यदक्ष कामगिरीची सुवर्ण सुरुवात

बातमी शेअर करा...

कर्तव्यदक्ष कामगिरीची सुवर्ण सुरुवात
प्रभाग १९ मध्ये नव-नगरसेवकांचा पहिल्याच दिवशी स्वच्छतेवर भर

अंबरनाथ : नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १९ मधून निवडून आलेले नगरसेवक श्री. निखिल सुनिल चौधरी व सौ. वीणा उगले यांनी पदभार स्वीकारताच कर्तव्यदक्षतेची ठाम सुरुवात केली. नगरसेवक म्हणून पहिल्याच दिवशी शिवबसव कॉम्प्लेक्स परिसरात कचरा साफसफाईची मोहीम राबवून त्यांनी जनतेसमोर दिलेला शब्द प्रत्यक्ष कृतीत उतरवला.

निवडणुकीदरम्यान प्रभागातील स्वच्छता, मूलभूत सुविधा आणि नागरी समस्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले होते. त्या पार्श्वभूमीवर पहिल्याच दिवशी स्वच्छता मोहिमेला प्राधान्य देत जनसेवेच्या कार्याला सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले.

यावेळी नगरसेवक निखिल चौधरी व सौ. वीणा उगले यांनी प्रभाग क्रमांक १९ मधील सर्व नागरिकांचे आभार मानत, “जनतेने दाखविलेल्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी सातत्याने, प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करू,” असा विश्वास व्यक्त केला. ही केवळ सुरुवात असून, पुढील काळात प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम