
कर्नाटकमध्ये एसयूव्ही-बस अपघातात ६ जण ठार
कर्नाटकमध्ये एसयूव्ही-बस अपघातात ६ जण ठार
विजयपुरा : कर्नाटकच्या विजयपुरा जिल्हयात बुधवारी सकाळी नियंत्रण हुकलेले एसयूव्ही वाहन-खासगी बस व अन्य एका वाहनाला धडकल्याने झालेल्या विचित्र अपघातात ६ जण ठार झाले. बसवाना बागेवाडी तालुक्यातील मनागुली गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये एसयूव्हीतील चालक व तेलंगणातील टी. भास्कर नामक बँक व्यवस्थापक, त्यांची पत्नी, मुलगा व मुलगी तसेच बसचालकाचा समावेश आहे. अपघातात एसयूव्हीतील दहावर्षीय बालक चमत्कारीकरीत्या बचावला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. विजयपुराचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निम्बार्गी यांनी दिलेल्या माहितीनुसार एसयूव्ही वाहन सोलापूरच्या दिशेने जात होते. तर खासगी बस मुंबईहून बेल्लारीकडे येत होती. चालकाचे नियंत्रण हुकल्याने एसयूव्ही वाहन रस्त्याचे दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसला धडकल्याने ही दुर्घटना घडली. यावेळी नियंत्रण हुकलेली बस इतर वाहनाला जाऊन भिडली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम