कर्नाटक, बिहार, पंजाब, महाराष्ट्र सेमिफायनलमध्ये सीआयएससीई प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धा; आज फायनल

बातमी शेअर करा...

कर्नाटक, बिहार, पंजाब, महाराष्ट्र सेमिफायनलमध्ये

सीआयएससीई प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धा; आज फायनल

जळगाव, दि. ११ प्रतिनिधी : अनुभूती रेसिडेन्शियल स्कूल जळगावच्या (महाराष्ट्र)  फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या १७ वर्षांखालील सीआयएससीई राष्ट्रीय प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धा अतीतटीत आली आहे. आज झालेल्या चुरशीच्या सामन्यांतून सेमी फायनलसाठी चार संघानी धडक मारली आहे. बाद फेरीत होणाऱ्या सामन्यांमध्ये उद्या (दि.१२) ला कर्नाटक विरूद्ध बिहार व पंजाब विरूद्ध महाराष्ट्र यांच्यात लढत होणार आहे. यातून अंतिम सामन्यातील विजयी व उपविजयी ठरणाऱ्या संघाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती निवासी स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा अनिल जैन यांच्याहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

साखळी पद्धतीने खेळविण्यात आलेल्या आजच्या आठही सामन्यांमध्ये खेळाडूंनी आपले फूटबॉलमधील कौशल्य पणाला लावले. साखळी फेरीत सामन्यांमध्ये पंजाब वि.वि. गुजरात ४-०, महाराष्ट्र वि.वि. उत्तर प्रदेश ४-०, बिहार वि. वि. तामिळनाडू १-०, कर्नाटक वि. वि. वेस्ट बंगाल ५-०, पंजाब वि.वि. तेलंगना ६-०, तामिळनाडू वि गुजरात ०–० हा सामना बरोबरीत सुटला. कर्नाटक वि.वि. महाराष्ट्र १-०, बिहार वि.वि. तेलंगना ६-० विजयी झालेत. प्रत्येक सामन्यांमधील मॅन ऑफ दी मॅच खेळाडूला चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

तत्पूर्वी आज झालेल्या सामन्यांमध्ये नाणेफेकीसाठी जैन इरिगेशनचे अभंग अजित जैन, हेड कोच सुयश बुरकूल, जैन स्पोर्टस अकॅडमीचे प्रशासकीय अधिकारी अरविंद देशपांडे, अनुभूती निवासी स्कूलचे विक्रांत जाधव, मेडिकल ऑफिसर डॉ. स्नेहल पाटील, महाराष्ट्र तायक्वांडो असोसिएशनचे अजित घारगे, महाराष्ट्र क्रिकेट संघातील क्रिकेटपटू निरज जोशी, रणजीपटू ओम मुंढे, प्रशिक्षक मुश्ताक अली यांची उपस्थिती होती.

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धा यशस्वीतेसाठी सीआयएससीई स्पर्धा आयुक्त ललिता सावंत, सिद्धार्थ किल्लोस्कर (सीआयएससीई कौंन्सिलचे स्कूल मुंबई विभागाचे समन्वयक) यांच्या मार्गदर्शनाखाली जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, अनुभूती शाळेचे विक्रांत जाधव, तसेच प्रशिक्षक अब्दुल मोहसिन, सुयश बुरकुल, घनश्याम चौधरी, राहूल निंभोरे, उदय सोनवणे, वरूण देशपांडे यांच्यासह सहकाऱ्यांनी संयोजनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम