
कला व विज्ञान महाविद्यालय, कोळगाव येथे पोस्टर प्रदर्शन स्पर्धा उत्साहात
कला व विज्ञान महाविद्यालय, कोळगाव येथे पोस्टर प्रदर्शन स्पर्धा उत्साहात
भडगाव | किसान शिक्षण संस्था संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, कोळगाव येथे संस्थापक कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या पुण्यस्मरण सप्ताहानिमित्त आयोजित विविध उपक्रमांतर्गत आज पोस्टर प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात तात्यासाहेब व शारदा देवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या स्पर्धेत महाविद्यालयातील २२ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उद्घाटन वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. सुरेश कोळी यांच्या हस्ते झाले.
स्पर्धेचे आयोजन प्रा. दिनकर सूर्यवंशी (भौतिकशास्त्र व इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख), सौ. प्रविणा पाटील (रसायनशास्त्र विभाग प्रमुख) आणि सौ. सुनीता पाटील (जीवशास्त्र विभाग प्रमुख) यांनी केले.
यामध्ये कु. प्रियंका भावलाल पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला तर कु. निकिता हेमंत घोडके हिने द्वितीय क्रमांक मिळवला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्साहाने सहकार्य केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम