कलेच्या माध्यमातून जीवन समृद्ध होते- किरण सोहळे

रोटरी वेस्टतर्फे व्याख्यानाचे आयोजन

बातमी शेअर करा...

कलेच्या माध्यमातून जीवन समृद्ध होते- किरण सोहळे

रोटरी वेस्टतर्फे व्याख्यानाचे आयोजन

जळगाव प्रतिनिधि

देवादिकांपासून संगीत, नृत्य या कला असून कलेच्या माध्यमातून जीवन समृद्ध होते असे सुप्रसिद्ध संगीत शिक्षक व गायक किरण सोहळे यांनी प्रतिपादन केले. मायादेवी नगरातील रोटरी भवन मध्ये रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे संगीत रस सुरस या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष विनीत जोशी प्रशासकीय सचिव भद्रेश शाह यांची प्रमुख उपस्थिती होती.
व्याख्यानात बोलताना किरण सोहळे यांनी ओंकारध्वनी हा विश्वातील सर्वात पहिला सांकेतिक नाद होता. देवांच्या काळापासून संगीताची निर्मिती झाली असून त्यांच्या हातातही बासरी, विणा, डमरू, चिपळ्या हे वाद्य दिसतात. सामवेद हा संपूर्ण शास्त्रीय संगीताचा पाया आहे असे सांगितले.
गायनाच्या घराण्यात संगीत अडकल्यामुळे ते लुप्त होईल का? अशी भीती निर्माण झाली होती, कारण ही पद्धत म्हणजे गुरुमुखी विद्या होती. संगीताची लिपी ही उपलब्ध नव्हती असे सोहळे यांनी सांगून पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर आणि पंडित विष्णू नारायण भातखंडेकर या दोन ऋषितुल्य व्यक्तींनी स्वरलिपीची पुस्तके लिहिली त्यामुळे सर्वसामान्यांसाठी संगीत खुले झाल्याचे ते म्हणाले.
स्वर म्हणजे काय, त्याची व्याख्या त्यांनी सांगितली. परमेश्वराजवळ पोहोचण्याचा सर्वात जवळचा मार्ग म्हणजे संगीत आहे. संगीत हे शास्त्र आहे. मानसिक समाधान व आनंद देण्याचे काम अनेक शतकांपासून हजारो वर्षांपासून संगीत करीत असल्याचे सोहळे यांनी सांगितले.
आपल्या आयुष्यात जन्मापासून शेवटपर्यंतच्या सोळा संस्कारात देखील संगीताचा समावेश असल्याचे ते म्हणाले.
माजी अध्यक्ष नितीन रेदासनी यांच्या हस्ते सोहळे यांचा सत्कार करण्यात आला तर आभार माजी अध्यक्ष डॉ.सुशीलकुमार राणे यांनी मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम