कवय‍ित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी ई-रिक्षा सुविधेचा प्रारंभ

बातमी शेअर करा...

जळगाव (प्रतिनिधी) कवय‍ित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी ई-रिक्षा सुविधेचा प्रारंभ कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते  दि. १४ जुलै रोजी करण्यात आला.

यावेळी प्र-कुलगुरु प्रा. एस.टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य व वाहन समिती अध्यक्ष -नितीन झाल्टे, प्रा. म.सु. पगारे, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. सुरेखा पालवे, ॲङ अमोल पाटील, प्रा. महेंद्र रघुवंशी, प्रा. पवित्रा पाटील, डॉ. संदीप पाटील, राजेंद्र नन्नवरे कुलसचिव डॉ.विनोद पाटील, सीए रवींद्र पाटील उपस्थित होते. विद्यापीठ वाहन समितीने शिफारस केल्यानुसार विद्यापीठातील प्रशाळेत येणाऱ्या विद्यार्थी व बाहेरगावावरून विविध कामासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार ते विद्यापीठ प्रशासकीय इमारत या मार्गावर या ई-रिक्षा सुविधेचा वापर होणार आहे. ही सुविधा पुरविण्यासाठी विद्यापीठाने दोन ई-रिक्षा खरेदी केल्या आहेत. विद्यार्थ्यांना अल्प दरात ही सुविधा उपलब्ध होणार आहे. या सुविधेमुळे विद्यापीठात येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार आहे. यावेळी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. जयेंद्र लेकुरवाळे, सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी शरद पाटील व सहायक संजय पाटील यांचेसह विद्यापीठ कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम