
कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात ‘हर घर तिरंगा’ अभियान
कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात ‘हर घर तिरंगा’ अभियान
तिरंगा रॅली, मानवी साखळी आणि विविध स्पर्धांचे आयोजन
जळगाव, (प्रतिनिधी): कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘हर घर तिरंगा अभियान-२०२५’ मोठ्या उत्साहात राबवले जात आहे. या अभियानांतर्गत विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांमध्ये २ ते १५ ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उपक्रमांचे स्वरूप:
हे अभियान राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या माध्यमातून राबवले जात आहे. यामध्ये १३ ते १५ ऑगस्टदरम्यान तिरंगा रॅली, मशाल रॅली, तिरंगा मानवी साखळी आणि तिरंगा महोत्सव यांसारख्या कार्यक्रमांचा समावेश आहे. याशिवाय, विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी तिरंगा सोबत सेल्फी, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, भित्तीपत्रक स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा अशा स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे.
जनजागृतीवर भर:
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये नागरिकांमध्ये तिरंग्याबद्दल जनजागृती केली आहे. १३ ते १५ ऑगस्टदरम्यान प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा, यासाठी स्वयंसेवक आवाहन करत आहेत.
या अभियानांतर्गत विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीवरही १३ ते १५ ऑगस्टदरम्यान राष्ट्रीय ध्वज फडकवला जाणार आहे. १५ ऑगस्ट रोजी तिरंगा रॅली आणि तिरंगा मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, प्रशासकीय भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर विद्युत रोषणाई केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी दिली

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम