कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

बातमी शेअर करा...

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 

 

तिरंगा रॅली आणि मानवी साखळीचे आयोजन; उपस्थित विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ

 

जळगाव, दि. १५ (प्रतिनिधी): कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आज भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन आणि विद्यापीठाचा ३५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी आठ वाजता कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विद्यापीठ परिसरात भव्य तिरंगा रॅलीचे आणि मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी, उपस्थितांना सुभाष पवार यांनी नशामुक्तीची शपथ दिली.

या कार्यक्रमाला प्र-कुलगुरू एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. म. सु. पगारे, प्रा. पवित्रा पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील, वित्त व लेखा अधिकारी रवींद्र पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सचिन नांद्रे यांच्यासह अधिकार मंडळाचे सदस्य, विविध प्रशाळांचे संचालक, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम