कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंती व स्वा. सै. ज.सु.खडके पुण्यतिथी साजरी

बातमी शेअर करा...

 कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंती व स्वा. सै. ज.सु.खडके पुण्यतिथी  साजरी

जळगाव ;- लोक शिक्षण मंडळ जळगाव संचलित  स्वा. सै. ज. सु .खडके प्राथमिक विद्यामंदिर जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती व ज.सु. खडकेजी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील  व ज्येष्ठ शिक्षक श्री पवार सर श्रीमती धुमाळ मॅडम  यांच्या हस्ते बहिणाबाई चौधरी व कै. ज.सु.खडकेजी यांच्या प्रतिमेचे  प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे उपशिक्षिक तडवी सर यांनी केले.श्री. पवार सर यांनी शाळेचे आधारस्तंभ कै. ज.सु.खडकेजीच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. बहिणाबाईंच्या कार्याविषयी व जीवनाविषयी माहिती विद्यार्थ्यांना सौ सुजाता नेमाडे मॅडम यांनी  दिली. सदर प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील यांनी बहिणाबाईंच्या काव्याविषयी प्रकाश झोत टाकला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले शेवटी कार्यक्रम प्रमुख तडवी सर यांनी सर्वांचे आभार मानले. संस्थेच्या चेअरमन माननीय सिंधुताईंनी तसेच ललित  कोल्हे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम