
कवी सोहम शिंदे यांचा ‘पायलट पोएट’ कवितासंग्रह प्रकाशित; १८ व्या वर्षी राष्ट्रीय पातळीवर यश
कवी सोहम शिंदे यांचा ‘पायलट पोएट’ कवितासंग्रह प्रकाशित; १८ व्या वर्षी राष्ट्रीय पातळीवर यश
जळगाव – शहरातील लाठी शाळा परिसरातील रहिवासी आणि होतकरू विद्यार्थी सोहम श्याम शिंदे याने अवघ्या १८ व्या वर्षी इंग्रजी कवितांचा संग्रह “Pilot Poet” आंतरराष्ट्रीय प्रकाशक बुक लीफ पब्लिशिंग मार्फत प्रकाशित करून राष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडली आहे.
अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेच्या अभ्यासासोबत केवळ २० दिवसांत २३ इंग्रजी कविता लिहून सोहमने हा संग्रह तयार केला. बुक लीफ पब्लिशिंगच्या माध्यमातून या कविता Amazon सारख्या ऑनलाइन व्यासपीठांवर प्रकाशित झाल्या असून वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भावना, यथार्थ निरीक्षण आणि सामाजिक जाणीवा यांचा समतोल साधणाऱ्या या कवितासंग्रहाचे आकर्षक मुख्यपृष्ठ सोहमचा लहान भाऊ सुमेर शिंदे यांनी डिझाईन केले आहे.
लहानपणापासून साहित्य, कला आणि शिक्षण यांत रस असलेल्या सोहमने शैक्षणिक क्षेत्रातही विशेष कामगिरी केली आहे. नुकत्याच झालेल्या CET परीक्षेत त्याने ९७.६८ परसेंटाइल मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली.
सोहम शिंदे म्हणतो, “माझ्या कविता म्हणजे माझ्या मनातल्या विचारांचं प्रतिबिंब आहेत. त्या लिहिताना मी स्वतःशी संवाद साधतो. या कविता इतरांनाही प्रेरणा देतील, हीच अपेक्षा आहे.”
त्याच्या या यशामुळे शिंदे कुटुंब, शाळा आणि स्थानिक परिसरात आनंदाचे व कौतुकाचे वातावरण आहे. सोहम आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय पालकांना देतो.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम