काँग्रेस भाजपाचे देशात फक्त जातीचे राजकारण – ना. बच्चू कडू
रावेर प्रतिनिधी
देशात भाजप व काँग्रेस हे विकासाचे मुद्द्यांवर न बोलता जातीय राजकारण करीत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होऊनही शिक्षण, आरोग्य हे मूलभूत प्रश्न अद्याप कायम आहेत. देशात शाळा, रुग्णालयांची अतिशय वाईट अवस्था आहे. श्रीमंतांसाठी चांगल्या शाळा व चांगले रुग्णालये आहेत तर गरिबांसाठी अतिशय वाईट व्यवस्था आहे. ही आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी व गरीब शेतमजूर कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल भाऊ चौधरी यांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावे; असे आवाहन माजी मंत्री, आमदार तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी येथे केले. येथील छोरिया मार्केट परिसरात सायंकाळी झालेल्या सभेत ते बोलत होते. यंदाच्या निवडणुकीत योग चांगला आहे. या योगाचा फायदा आपल्याला होणार आहे. महायुती व महाविकास आघाडीचे सरकार न येता प्रहार पक्षाचे सरकार येणार आहे; असेही त्यांनी सांगितले. यावेळी संतोष चौधरी व अनिल चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. अनिल चौधरी हे यावेळी भावूक झाले होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम