कागदपत्रे सादर न केल्याने शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेच्या 2207 उमेदवारांचा निकाल रद्द

बातमी शेअर करा...

कागदपत्रे सादर न केल्याने शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेच्या
2207 उमेदवारांचा निकाल रद्द

जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा 2025 संदर्भात महत्त्वाची कारवाई करत व्यावसायिक अर्हतेची कागदपत्रे नियोजित मुदतीत सादर न केलेल्या 2207 उमेदवारांचा निकाल रद्द करण्यात आला आहे.

TAIT परीक्षा 27 मे ते 5 जून 2025 या कालावधीत आयबीपीएसमार्फत ऑनलाइन पद्धतीने राज्यातील 60 केंद्रांवर घेण्यात आली होती. परीक्षेसाठी 2,28,808 नोंदणी तर 2,11,308 उमेदवार उपस्थित होते. निकाल 18 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर करण्यात आला होता.

B.Ed. व D.El.Ed. appear म्हणून अर्ज केलेल्या उमेदवारांना व्यावसायिक अर्हतेची गुणपत्रके उत्तीर्ण झाल्यानंतर कमाल एक महिन्यात परिषदेकडे सादर करणे बंधनकारक होते. परिषदेकडून 15 सप्टेंबर आणि नंतर 25 सप्टेंबरपर्यंत मुदत देऊनही 2207 उमेदवारांनी कागदपत्रे मुदतीत सादर केली नाहीत. त्यामुळे त्यांचा निकाल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या उमेदवारांची यादी परिषदेतर्फे www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून या संदर्भातील कोणत्याही विनंतीचा विचार केला जाणार नाही, असे आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम