कागदावर सही होणं हे कामाचं तंत्र आहे, पण तीच जीवनात फरक घडवते, तो सेवाभावाचा मंत्र”– पालकमंत्री गुलाबराव पाटील

बातमी शेअर करा...

कागदावर सही होणं हे कामाचं तंत्र आहे, पण तीच जीवनात फरक घडवते, तो सेवाभावाचा मंत्र”– पालकमंत्री गुलाबराव पाटील

जिल्हा नियोजन समिती योजनांअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विभागांचा सत्कार

जळगाव,“कागदावर सही होणं हे केवळ तंत्र आहे, परंतु ती सही एखाद्याच्या जीवनात परिवर्तन घडवते, हेच सेवाभावाचं खरे मंत्र आहे. लोकांचा विश्वास हेच आपल्या कामाचं खरे प्रमाणपत्र आहे,” असे विचार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. जिल्हा नियोजन समिती कार्यालयाशी निगडीत योजनांअंतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १२ विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करताना ते बोलत होते.

याआधी मागील आठवड्यात महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला होता. त्यानंतर आता जिल्हा नियोजन योजनांअंतर्गत प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या विविध विभागांचा सन्मान करण्यात आला. “आपल्याकडे आलेला माणूस हा आपलाच आहे, या भावनेने निर्णय घ्या, त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य फुलवण्याचा प्रयत्न करा,” असेही आवाहन पालकमंत्री पाटील यांनी या प्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना केले.
“आपल्या कार्याची ही पावती आहे, शाबासकीची थाप आहे,” असे म्हणत त्यांनी सत्कारप्राप्त सर्व १२ विभागांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. त्यांनी इतर उत्कृष्ट काम करणाऱ्या विभागांचाही उल्लेख करत त्यांचेही अभिनंदन व्यक्त केले. “आपण सगळेच एका ध्येयाने काम करत आहोत – शेतकरी सुखी व्हावा, सामान्य माणसाचं जीवन अधिक सुसह्य व्हावं,” असेही त्यांनी नमूद केले.
या गौरव सोहळ्यास खासदार सौ. स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल, उपवनसंरक्षक ( वन्य जीव ) जमीर शेख, उपवनसंरक्षक ( जळगाव विभाग ) प्रवीण ए, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, सहायक आयुक्त (सामाजिक न्याय) योगेश पाटील, आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार व इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.
यावेळी राज्यात जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक हे दोघेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या 100 कृती आराखड्यात राज्यात तिसरे आले. या उल्लेखनीय यशाबद्दल गौरव पालकमंत्र्यांनी दोघांचाही गौरव केला.
या गौरव सोहळ्यात पुढील विभागांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला:
जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, जळगाव, महिला व बाल विकास विभाग, जि.प. जळगाव,जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव,
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल,सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या., जळगाव, शासकीय दंत महाविद्यालय, जळगाव, लेखा व वित्त विभाग, जि.प. जळगाव, लघुपाटबंधारे विभाग, जि.प. जळगाव, जळगाव वनविभाग, यावल वनविभाग, खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत काम करणारे संबंधित विभाग.
गौरवप्राप्त अधिकारी व विभाग पुढीलप्रमाणे
श्री. विशाल जाधव, सहायक संशोधन अधिकारी,श्रीमती अपर्णा बावणे, सहायक संशोधन अधिकारी,श्री. हर्षल दांडेकर, उपलेखापाल, श्रीमती शोभा जाधव, सांख्यिकी सहायक, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जि.प. जळगाव – अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास, सहआयुक्त, नगरपरिषद शाखा, जळगाव – वस्ती सुधारणा, महावितरण, जळगाव – मोफत विद्युत जोडणी योजना, जिल्हा क्रीडा अधिकारी – क्रीडांगण विकास, जिल्हा माहिती कार्यालय – योजना प्रसिद्धी, श्री. राजेंद्र कांबळे, कार्यालय अधिक्षक (समाज कल्याण), श्री. सुनिल महाजन, वरिष्ठ निरीक्षक, श्री. चेतन चौधरी, तालुका समन्वयक,
*‘सुंदर माझी शाळा’ अभियानांतर्गत विजेते* *शासकीय आश्रमशाळा* लालमाती (प्रथम क्रमांक) – श्री. मनेष तडवी, श्री. राजेंद्र लवणे,
आश्रमशाळा,वाघझिरा ता. यावल (द्वितीय क्रमांक) – श्री. किशोर महाजन, श्री. सदाशिव पवार
*अनुदानित आश्रमशाळा* पिपळे (प्रथम क्रमांक) – श्री. उदय पाटील, श्री. पवनकुमार पाटील
अनुदानित आश्रमशाळा, लोहारा (द्वितीय क्रमांक) – श्री. सुनिल सपकाळे, श्री. विश्वास गायकवाड,
आदिवासी मुलींचे वसतीगृह (प्रथम) – श्रीमती अलका दाभाडे, जावेद तडवी
आदिवासी मुलांचे वसतीगृह (द्वितीय) – श्री. वासुदेव बच्छे, संदीप पाटील
*डिजीटल क्लासरूम योजनेअंतर्गत विशेष कार्य–*
श्री. भैय्यासाहेब देशपांडे, शासकीय आश्रमशाळा (चांदसर), सह. प्रकल्प अधिकारी – श्री. राजेंद्र लवणे, श्री. पवनकुमार पाटील,
श्री. विनोद पडोळे, कनिष्ठ लिपिक, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

*जिल्हा उद्योग पुरस्कार*–
महाराष्ट्र शासन, उद्योग संचालनालय व जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांच्यातर्फे देण्यात येणारा जिल्हा उद्योग पुरस्कार मे. आदिनाथ अँग्रो इंडस्ट्रीज, पारोळा (मालक – श्री. चकोर दिलीप जैन) यांना प्रदान करण्यात आला. सदर उद्योगामध्ये १०० लोकांना रोजगार उपलब्ध असून वार्षिक उलाढाल रुपये २४ कोटी आहे. उद्योगातर्फे शेतीसाठी लागणारे ऑरगॅनिक फर्टीलायझरचे उत्पादन करण्यात येते. पुरस्कारांतर्गत सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व रुपये १०,०००/- रोख रक्कम देण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाची उल्लेखनीय कामगिरी –
निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव घटकाने सन २०२४-२५ या कालावधीत एकूण ४३७ गुन्ह्यांची नोंद करत १.६० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत ६३ प्रस्ताव दाखल करण्यात आले असून एका सराईत गुन्हेगारास MPDA कायद्यान्वये कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत एमआयडीसी, जळगाव येथे बनावट मद्यनिर्मिती प्रकरणी ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुख्यमंत्री १०० दिवस कार्यक्रमांतर्गत जळगाव तालुक्यातील वराड, वाळकी, लमांजन, कुर्हाडदा व म्हसावद गावातील हातभट्टी केंद्रांवर कारवाई करुन त्यांचे समूळ उच्चाटन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाद्वारे जिल्ह्यात शासकीय योजनांच्या पारदर्शक व प्रभावी अंमलबजावणीस हातभार लावणाऱ्या विभागांना योग्य ते प्रोत्साहन देण्यात आले असून इतर विभागांसाठीही प्रेरणादायी पाऊल ठरले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी केले. त्यात त्यांनी 2024-25 मध्ये जिल्हा नियोजन विभागाकडून करण्यात आलेल्या संपूर्ण कामाचा आढावा घेतला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम