
कानात वस्तू घालणे टाळा : त्रास जाणवल्यास वैद्यकीय तपासणी करा !
कानात वस्तू घालणे टाळा : त्रास जाणवल्यास वैद्यकीय तपासणी करा !
महादेव हॉस्पिटल येथील डॉ. अनुश्री अग्रवाल यांची माहिती
जळगाव : कानात मळ जमा होणे किंवा घरीच काहीतरी घालून तो काढण्याचा प्रयत्न करणे धोकादायक असू शकते, ज्यामुळे कानाचे आरोग्य धोक्यात येते. कानात वस्तू घालून त्याच्याशी खेळणे थांबवा. हे त्रासदायक होऊ शकते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे, अशी माहिती कान-नाक-घसा तज्ज्ञ तथा महादेव हॉस्पिटल येथील विभागप्रमुख डॉ. अनुश्री अग्रवाल यांनी दिली आहे.
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पिटल येथे कान-नाक-घसा विभागात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत.येथील तज्ज्ञ डॉ. अनुश्री अग्रवाल यांनी नागरिकांसाठी माहिती दिली. लहान मुलांमध्ये कानाचे संक्रमण खूप सामान्य आहे. बाहेरचा किंवा मधला कान संक्रमित होऊ शकतो, ज्यामुळे द्रव साठणे आणि वेदना होऊ शकते. लवकर उपचार महत्त्वाचे आहेत, ऐकणे कमी होणे हा एक गंभीर मुद्दा आहे आणि दीर्घकाळ इअरफोन वापरणे, मोठा आवाज ऐकणे यामुळे ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
वारंवार कान दुखत असल्यास किंवा स्राव येत असल्यास डॉक्टरांना भेटा. इअरफोनचा वापर मर्यादित करा आणि आवाजाची पातळी कमी ठेवा. कानामध्ये पिन किंवा इतर टोकदार वस्तू घालू नका.कानाच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले जीवनसत्त्वे आणि खनिजे आहारात समाविष्ट करा, असेही डॉ. अग्रवाल यांनी सांगितले आहे. त्रास जाणवल्यास नागरिकांनी सर्व सुविधायुक्त असलेल्या आकाशवाणी चौकात महादेव हॉस्पिटल येथे उपचारासाठी यावे, असे आवाहन रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी (९३२५१५ ०००४, ९५८८४ ७६५९६) यांच्याशी संपर्क साधावा.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम