कामावर पायी जाणाऱ्या तरुणाला भरधाव दुचाकीची धडक

बातमी शेअर करा...

कामावर पायी जाणाऱ्या तरुणाला भरधाव दुचाकीची धडक

जळगाव : कामावर पायी

जात असलेल्या समोरुन येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात कादर हिलाल पटेल (वय ४३, रा. सुप्रिम कॉलनी) हे गंभीर जखमी झाले. ही घटना दि. ३० रोजी आरएल चौफुली ते फातेमा नगर दरम्यान घडली. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सुप्रिम कॉलनीत राहणारे कादर हिलाल पटेल हे दि. ३० रोजी सकाळच्या सुमारास कामावर पायी जाण्यासाठी निघाले. आरएल चौफुली

ते फातेमा नगर दरम्यान, रस्त्याने पायी जात असतांना समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १९, ईके ९४७१) क्रमांकाच्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात पटेल यांच्या डोक्याला आणि शरिराला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांनी दि. ३० रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार दुचाकीस्वार रविंद्र महाजन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ सचिन पाटील हे करीत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम