कारपेंटर बांधवांसाठी विश्वकर्मा युवाशक्ती प्रतिष्ठानचा उपक्रम ; ३५ ड्रिल व कटर मशीनचे वाटप

बातमी शेअर करा...

कारपेंटर बांधवांसाठी विश्वकर्मा युवाशक्ती प्रतिष्ठानचा उपक्रम ; ३५ ड्रिल व कटर मशीनचे वाटप

जळगाव : विश्वकर्मा युवाशक्ती प्रतिष्ठानतर्फे कारपेंटर बांधवांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून ३५ ड्रिल व कटर मशीनचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्री विश्वकर्मा भगवान यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. ज्येष्ठ समाजसेवक एम. टी. लुले, गोपाल देवरे, हरी लोहार, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, विद्यानंद मानकर बाळासाहेब पांचाळ, यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रतिष्ठानचे उद्घाटन झाले.लहान चिमुकल्याने पहिली पावती काढताच कारपेंटर बांधवांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पहिल्या क्रमांकावर कटर मशीनचे बक्षीस जाहीर होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.कारपेंटर बांधवांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या निस्वार्थ कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले. समाजासाठी दिलेला त्यांचा हा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.या वेळी ॲड. जमील देशपांडे यांनी, “मी सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे,” असे आश्वासन देत समाज एकत्रित राहण्याचे आवाहन केले.

संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी समाजाला संबोधित करतेवेळी संघटनेचे उद्दिष्ट सांगितले, विश्वकर्मा युवाशक्ती प्रतिष्ठान ही संघटना समाज बांधव यांच्याकडून आर्थिक मदत घेणार नाही, तसेच ही संघटना राजकीय पक्षासाठी काम करेल. असे निकम यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम