कारवाई – गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

शहरातील अजिंठा चौफुली परिसरातील घटना

बातमी शेअर करा...

बातमीदार l शुक्रवार दि. १ मार्च २०२४

जळगाव ;- रेकॉर्डवरील गुन्हेगारा गावठी कट्टा घेऊन फिरत असताना शहरातील अजिंठा चौफुली परिसरात एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे. अर्षद शेख हमीद उर्फ अण्णा ( वय 24, रा. गेंदालाल मिल, जळगाव) असे या संशयित आरोपीचे नाव आहे.

एमआयडीसी पोलीस स्टेशनला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार, अजिंठा चौफुली परिसरातील चौकात अर्षद शेख याला ताब्यात घेण्यात आले. त्यानुसार त्याच्याकडून ३५ हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा आणि दोन जिवंत काडतूस त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले आहेत.

पोलीस नाईक सुधीर साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायमूर्ती देशमुख यांनी त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किरण पाटील, सुधीर साळवे, सचिन पाटील, किशोर पाटील, ललित नारखेडे, राहुल रगडे, नितीन ठाकूर या पथकाने केली आहे. अर्षद खान याच्यावर यापूर्वी चार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम