
काळ्या फितीसह नमाज अदा करून वक्फ संशोधन विधेयकाचा निषेध
१७५ मशिदीतून ५२ हजार लोकांचा विरोध
काळ्या फितीसह नमाज अदा करून वक्फ संशोधन विधेयकाचा निषेध
१७५ मशिदीतून ५२ हजार लोकांचा विरोध
जळगाव (प्रतिनिधी): ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डाच्या सूचनेनुसार पवित्र रमजान महिन्याचा शेवटचा शुक्रवार विशेष ठरला. या दिवशी जळगाव शहर व जिल्ह्यातील १७५ मशिदींमध्ये सुमारे ५२ हजार मुस्लिम बांधवांनी काळ्या फिती लावून नमाज अदा करत वक्फ संशोधन विधेयक २०२४ ला तीव्र विरोध नोंदविला. यावेळी सरकारला बिल परत घेण्याची विनंती करत ठराव संमत करून तो जिल्हाधिकारी जळगाव मार्फत महामहीम राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला.
मशिदीसमोर निदर्शने:
प्रत्येक मशीदसमोर वक्फ बिलाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी ठरावाचे वाचन करून विधेयकाबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
प्रतिनिधींची निवेदन सादर:
प्रातिनिधिक स्वरूपात मशिदींच्या प्रतिनिधींनी एकता संघटनेच्या माध्यमातून अप्पर जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र पाटोळे यांना निवेदन दिले आणि आपला विरोध नोंदविला.
उल्लेखनीय उपस्थिती:
मस्जिद-ए-अक्सा चे फारुक शेख, मदिनाचे अन्वर खान, अबूबकरचे फारुख पटेल, हनफियाचे शाहीर तेली, बिलालचे दानिश पिंजारी, काँग्रेसचे मुक्तदिर देशमुख, अर्कमचे बशीर बुरानी, उमरचे अनिस शहा, अल्वजीरचे अबू शाफे, अलमनांचे जावेद शेख, अलबर्गाचे सईद शेख, बरकतीचे युसूफ खान, नूरानीचे इमरान शेख, अल वजीरचे मुजाहिद अख्तर, अब्दुल सत्तार, उमरचे सलीम इनामदार, अलखिदमतचे युसुफ शाह, अमळनेरचे मौलाना रियाज, कुदरत अली, शेख अर्शद, गफार खाटीक, जळगाव शहराचे रफिक शेख, ताहेर शेख, तहसील खान, वसीम शेख, वसीम पटेल, अरबाज खान, राहील अहमद, शेर खा मोहम्मद खान, शेख रियाजोद्दीन, अब्दुल गफार खाटीक आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
सामाजिक एकतेचा संदेश:
या आंदोलनामुळे मुस्लिम समाजाने आपल्या हक्कांसाठी एकजुटीने आवाज उठवल्याचा संदेश दिला आहे. वक्फ संशोधन विधेयकाबाबत सरकारने सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम