![](https://ebatmidar.com/wp-content/uploads/2025/02/New-Project.jpg)
काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये “हाऊस होल्ड मॅनेजमेंट वर मार्गदर्शन
उपक्रमात सीनियर केजी च्या विद्यार्थ्यांचा सहभाग
काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये “हाऊस होल्ड मॅनेजमेंट वर मार्गदर्शन
उपक्रमात सीनियर केजी च्या विद्यार्थ्यांचा सहभाग
जळगाव प्रतिनिधी
विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये पूर्व प्राथमिक विभागात दिनांक 30 /1/ 25 रोजी “हाऊस होल्ड मॅनेजमेंट “ही ऍक्टिव्हिटी नर्सरी जुनियर व सीनियर केजीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या समुपदेशिका सौ चंचल रत्नपारखी यांनी घेतली.
मुलांना त्यांची स्वतःची कामे योग्य प्रकारे करण्यास प्रवृत्त करण्यासाठी तसेच शाळेतून आल्यावर आपल्या वस्तू जसे की गणवेश, शूज, स्कूल बॅग, खेळणी कशा व्यवस्थित ठेवाव्या हे प्रात्यक्षिक द्वारे दाखविण्यात आले . उपक्रमात सीनियर केजी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मुलांना वैयक्तिक जबाबदाऱ्या कळण्यासाठी तसेच त्यांना स्वावलंबी व स्वयंशिस्त लावण्यासाठी ही ऍक्टिव्हिटी घेण्यात आली.
या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षिका स्मिता राव या हजर होत्या.
![Jain advt](https://ebatmidar.com/wp-content/uploads/2022/08/IMG_1987.jpg)
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम