काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

शिवरायांच्या जीवनावरील नाटिका सादर

बातमी शेअर करा...

काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
शिवरायांच्या जीवनावरील नाटिका सादर
जळगाव प्रतिनिधी

विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये १८ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शिव पाळणा आणि शिव आरतीने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांना दिनविशेषाची माहिती स्वरा सोनार, कर्मण्य कुवर आणि शिव कीनगे यांनी दिली. श्रीतिक देशमुख बाल शिवाजींच्या भुमिकेत होता. दृष्टी ठाकूर ज्ञानेश्वरी शुक्ला जिजाबाईंच्या भूमिकेत तर लक्ष नेमाडे ,हर्षित शर्मा शिवरायांच्या भूमिकेत होते. विधी किनगे आणि ज्ञानेश्वर पवार यांनी आपल्या पहाडी आवाजात शिवगर्जना केली .सहावीच्या विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनावरील नाटिका सादर केली .वेदांत तिवारी आणि सिद्धीशा चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले

प्राचार्य प्रवीण सोनावणे यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान कार्याची महती सांगत त्यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाला शाळेचे प्रशासकीय अधिकारी मिलिंद पुराणिक, समन्वयिका अनघा सागडे दीदी, स्वाती अहिरराव दिदी श्री. विकास कोळीसर
प्रदीप पाटील सर, चंचल रत्नपारखी दीदी, संजय भोंडे, निलेश बडगुजर सर उपस्थित होते. तसेच शालेय समितीच्या अध्यक्ष हेमाताई अमळकर यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम प्रमुख, सौ.मोनाली पाटील समाधान पाटील यांच्यासह ज्योती देशमुख, सरोज जैस्वाल, स्वाती कुलकर्णी आणि इतर शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम