
काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल येथे महाशिवरात्री उत्साहात
स्मिता राव यांच्या हस्ते महादेवाची पूजा
काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल येथे महाशिवरात्री उत्साहात
स्मिता राव यांच्या हस्ते महादेवाची पूजा
जळगाव प्रतिनिधी
विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल, पूर्व प्राथमिक विभागात दिनांक 25 /2/ 2025 रोजी महाशिवरात्री साजरी करण्यात आली. सर्वात प्रथम ज्येष्ठ शिक्षिका सौ.स्मिता राव यांच्या हस्ते महादेवाची पूजा करण्यात आली
. महादेवाच्या भूमिकेत धीरज माळी व तसेच पार्वतीच्या भूमिकेत सुरभी पाटील ,या विद्यार्थ्यांनी वेशभूषा परिधान केली होती. नर्सरी चा विद्यार्थी प्रसन्न अमृतकर याने महादेवाबद्दल महत्व सांगितले.
महाशिवरात्री आपण का साजरी करतो व कशी साजरी करतो तसेच बारा ज्योतिर्लिंगांची माहिती सांगण्यात आली. या कार्यक्रमास प्राचार्य प्रवीण सोनावणे, तसेच समन्वयिका सौ. अनघा सागडे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाच्या प्रमुख अनुश्री देशपांडे होत्या.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम