कासोदा पोलिसांची धडक कारवाई; गुटखा विक्रेत्यावर छापा, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा...

कासोदा पोलिसांची धडक कारवाई; गुटखा विक्रेत्यावर छापा, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

कासोदा (ता. एरंडोल) : कासोदा पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यावर कारवाई करत तब्बल ५ लाख १० हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुरुवारी (दि. ११ सप्टेंबर) ही कारवाई करण्यात आली.

कासोदा व परिसरात गुटखा विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती स.पो.नि. नीलेश राजपूत यांना मिळाली होती. त्यानुसार कासोदा–एरंडोल मार्गावर सापळा रचून पोलिसांनी संशयित चारचाकी (क्र. एमएच २० बीव्ही ३३६८) तपासली असता, त्यामध्ये गुटख्याचे मोठ्या प्रमाणात पाकिटे आढळली. वाहन चालकाकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.

यामध्ये ३ लाख १० हजार ८६० रुपयांचा गुटखा आणि २ लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ५ लाख १० हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी किशोर हेमंत बाळकृष्ण याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास कासोदा पोलीस ठाण्यात सुरु आहे.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व स.पो.नि. नीलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. विजय काटकर, पो.ना. प्रवीण पाटील, योगेश पाटील, पो.हे.कॉ. कुशल देवरे, प्रशांत पगारे, पो.ना. रमेश तोडे व अकील मुजावर यांच्या पथकाने केली. कासोदा पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम