
कासोदा येथे जुगारावर पोलिसांचा छापा; सात जणांना अटक
कासोदा येथे जुगारावर पोलिसांचा छापा; सात जणांना अटक
एरंडोल (प्रतिनिधी) – कासोदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी जुगारावर मोठी कारवाई करत सात जुगारांना रंगेहाथ पकडले आहे. ११ सप्टेंबर रोजी बांभोरी शिवारातील गालापूर रोडवरील एका शेतात हा छापा टाकण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ६६ हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, त्यांनी आपल्या पथकासह बांभोरी शिवारात सापळा रचला. पोलिसांच्या पथकात पोकॉ अकिल मुजावर, समाधान तोंडे, प्रशांत पगारे, कुणाल देवरे आणि योगेश पाटील यांचा समावेश होता. संध्याकाळी ४:३० वाजता टाकलेल्या छाप्यात, आरोपी पैशांवर पत्त्यांचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले सर्व आरोपी कासोदा येथीलच आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे: शेख फारुख शेख नबी , शेख शहीद शेख रफिक , शेख निजाम शेख सिराज , तस्लीम सुलेमान खान , शेख हमीद शेख शौकत , शेख हमीद शेख अमीर , शेख मुस्ताक खान अमीर खान
या कारवाईत पोलिसांनी एकूण ₹१,६६,०३० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यात ₹३,३८० रोख रक्कम, ₹२२,००० किमतीचे मोबाईल फोन आणि ₹१,४०,००० किमतीच्या तीन मोटरसायकलींचा समावेश आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम