
किडनीची लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार करा – डॉ.अभय जोशी
किडनीची लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार करा – डॉ.अभय जोशी
जागतिक किडनी दिनानिमित्त किडनी विषयक सुरक्षा व जनजागृती विषयावर व्याख्यान
जळगाव ( प्रतिनिधी) : किडनी हा शरीरातील महत्वाचा अवयक आहे त्यामुळे किडनी आजाराची सर्वसाधारण लक्षणे दिसल्यानंतर लगेच उपचार सुरु केल्यास किडनी वाचू शकते असे प्रतिपादन जळगाव शहरातील प्रसिध्द किडनी तज्ज्ञ डॉ.अभय जोशी यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आरोग्य केंद्राच्यावतीने जागतिक किडनी दिनानिमित्त किडनी विषयक सुरक्षा व जनजागृती या विषयावर डॉ.जोशी यांचे व्याख्यान विद्यापीठात दि.१३ मार्च रोजी अधिसभागृहात आयोजित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे व कुलसचिव डॉ. विनोद पाटील हे होते. डॉ.जोशी पुढे म्हणाले की, वेदनाशमक गोळया केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्याव्यात. नियमित व्यायाम व पुरेसे पाणी प्यावे. ब्लड प्रेशर व साखरेचे रक्तातील प्रमाण नियंत्रित ठेवावे. तसेच जागतिक सर्व्हे नुसार मधुमेहामुळे किडनी आजार होण्याचे प्रमाण ४४ टक्के आहे. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी अशा व्यक्तींनी काळजी घेणे गरजेचे आहे. ब्लड प्रेशर वाढलेले असणे, सांध्यांमध्ये दुखणे, लघवीत फेस येणे, रात्रीच्यावेळी वारंवार लघवीला येणे अशी काही प्रमुख लक्षणे किडनी आजाराची आहेत. त्याकरीता वेळीच निदार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोप करतांना कुलगरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी सांगितले की, आपल्या राहणीमानात, खाण्यापिण्याच्या सवयी यामध्ये संतुलन ठेवावे. पुरेसा व्यायाम करावा. किडनी हा शरीरातील महत्वाच्या अवयवांपैकी एक असल्याने किडनी आजाराच्या प्राथमिक लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घ्यावेत. यावेळी प्रश्नोत्तरे झाली. कार्यक्रमाचे नियोजन आरोग्य केंद्राच्या डॉ.रोशनी पाटील व तेथील कर्मचारी यांनी केले. यावेळी विद्यापीठ प्रशाळेचे संचालक, शिक्षक, शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सुत्रसंचालन सुभाष पवार यांनी केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम