
किनगाव येथे जुगार अड्ड्यावर धाड ; १५ जुगारी ताब्यात
किनगाव येथे जुगार अड्ड्यावर धाड ; १५ जुगारी ताब्यात
यावल प्रतिनिधी यावलचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना तालुक्यातील किनगाव खुर्द गावातील पाण्याच्या टाकीच्या खाली सार्वजनिक ठिकाणी काही जण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले व त्यांनी येथुन 15 जणांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य रोख रक्कम असा एकूण तीन हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व याप्रकरणी १५जणांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
किनगाव खुर्द ता. यावल या गावात पाण्याची टाकी आहे. या पाण्याच्या टाकीच्या खाली दीपक भोई, शांताराम पाटील, सलीम मुसलमान, शेख जाबीर, शिवाजी पाटील, नितीन वराडे, शशिकांत पाटील, भागवत पाटील, अंकुश कोळी, सुभाष महाजन, साहेबराव साळुंखे, वासुदेव वराडे, रवींद्र पाटील, दिलीप वंजारी, सुनील पाटील हे 15 जण जुगार खेळत होते. याची माहिती पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. तेव्हा त्यांनी पोलिसांचे पथक त्या ठिकाणी पाठवले व या पथकाने या 15 जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य असा तीन हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी यावल पोलिसात पोलीस हवालदार सचिन पाटील यांच्या फिर्यादीवरून 15 जणांवरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम