किरकोळ कारणावरून तरुणाला झोडपले ; चौघांविरुद्ध गुन्हा

गेंदालाल मिल परिसरातील घटना

बातमी शेअर करा...

किरकोळ कारणावरून तरुणाला झोडपले ; चौघांविरुद्ध गुन्हा

गेंदालाल मिल परिसरातील घटना
जळगाव : शहरातील गेंदालाल मिल परिसरात केवळ गाडीवर बसण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे रुपांतर हाणामारीत होऊन एका तरुणाला चौघांनी जबर मारहाण करत गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी चौघांविरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्पेश संजय आरखे (वय १८) रा. गेंदालाल मिल परिसर हा आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. रविवारी, २० जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास कल्पेशच्या गाडीवर अरबाज नावाचा तरुण बसलेला होता. त्यास गाडीवरून खाली उतरविण्यास सांगितले असता त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर थोड्याच वेळात अरबाज आपल्या मित्रांसह – साहिल मुल्तानी, फरदीन व आर्शीया (पूर्ण नावे अद्याप निष्पन्न नाहीत) यांच्यासह परत आला आणि चौघांनी मिळून कल्पेशवर अचानक हल्ला केला.

या हल्ल्यात कल्पेशला गंभीर दुखापत झाली असून, त्याचा मित्र रोहन जाधव भांडण सोडविण्यास गेला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी कल्पेश आरखे याच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार प्रकाश जाधव करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम