किरकोळ कारणावरून वृध्दासह कुटुंबियाना बेदम मारहाण

बातमी शेअर करा...

किरकोळ कारणावरून वृध्दासह कुटुंबियाना बेदम मारहाण

जळगावः तालुक्यातील नांद्रा येथे किरकोळ वादातून एका वृद्धासह त्याच्या कुटुंबीयाला गावातील दोन जणांनी घरात घुसून शिवीगाळ करत बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना शनिवारी ३१ मे रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. या संदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील नांद्रा येथे बापू रतन चौधरी (वयः ६३) हे वृद्ध आपल्या मुलगा आणि पत्नी यांच्या सहवास्तव्याला आहेत. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. दरम्यान शनिवारी ३१ मे रोजी सकाळी १० वाजता किरकोळ वादातून गावात राहणारे सुभाष श्रावण कोळी आणि त्याचा मुलगा आशिष सुभाष कोळी या दोघांनी बापू चौधरी यांच्या घरात घुसून त्यांच्यासह त्यांचा मुलगा आणि पत्नी यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण करून दुखापत करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान या संदर्भात बापू चौधरी यांनी जळगाव तालुका पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारे सुभाष श्रावण कोळी आणि आशिष सुभाष कोळी दोन्ही राहणार नांद्रा ता. जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत बदर करीत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम