किरकोळ वादातून तरुणावर हल्ला लाकडी दांडा, लोखंडी विळ्याने वार

अमळनेर तालुक्यातील धानोरा येथील घटना ; चौघांवर गुन्हा

बातमी शेअर करा...

किरकोळ वादातून तरुणावर हल्ला लाकडी दांडा, लोखंडी विळ्याने वार

अमळनेर तालुक्यातील धानोरा येथील घटना ; चौघांवर गुन्हा

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर तालुक्यातील धानोरा गावात किरकोळ कारणावरून एका ३६ वर्षीय तरुणाला चार जणांनी शिवीगाळ करत लाकडी दांडा आणि लोखंडी विळ्याने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी, २६ मार्च रोजी सकाळी ९ वाजता घडली. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिरालाल विश्वास भिल (वय ३६, रा. धानोरा, ता. अमळनेर) हा तरुण आपल्या कुटुंबासह राहतो आणि शेती करून उदरनिर्वाह करतो. बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास हिरालाल दुचाकीवरून गावातून जात असताना, गावातील छबिलाल रामदास सोनवणे, भोल्या रामदास सोनवणे, संतोष रामदास सोनवणे आणि अनिता बिलाल सोनवणे (सर्व रा. धानोरा) यांनी त्याला अडवून शिवीगाळ सुरू केली. किरकोळ वादाचे कारण पुढे वाढत गेले आणि या चौघांनी हिरालालवर लाकडी दांडा आणि लोखंडी विळ्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.

या हल्ल्यानंतर हिरालाल भिल याने मारवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, चारही संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सुनील आगोणे करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम