किलबिल बालक मंदिर येथे “अभ्यास जत्रा” कार्यक्रम

सिनियर बालवाडीच्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद

बातमी शेअर करा...

किलबिल बालक मंदिर येथे “अभ्यास जत्रा” कार्यक्रम
सिनियर बालवाडीच्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद
जळगाव प्रतिनिधी

के. सी. ई खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित किलबिल बालक मंदिर “अभ्यास जत्रा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी ए .टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. प्रणिता झांबरे आणि किलबिल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . अर्चना नेमाडे उपस्थित होत्या. झांबरे मॅडमनी सिनियर बालवाडीच्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधत विद्यार्थ्यांना बोलते केले.
तसेच पालकांनी पण विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधत अभ्यास जत्रेचा मनमुराद आनंद लुटला, विद्यार्थी पण उस्फृत्तपणे शाळेतील शैक्षणिक साहित्य विषयी माहिती सांगत होते. उदा.( Thirsty crow story, रेल्वे स्टेशन माहिती, शेतीची माहिती, Fruits and vegetables इत्यादी) या अभ्यास जत्रेमधील सिनियर बालवाडीचे तिघं गटातील विद्यार्थी जसे सत्यम, शिवम, सुंदरम प्रत्येकी एक तास याप्रमाणे सहभागी होते. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम