
किशोर पाटील यांना “गुणवंत शिक्षक” पुरस्कार
जनमत प्रतिष्ठानतर्फे झाला गौरव
जळगाव ;- जनमत प्रतिष्ठान, जळगाव आणि मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. चिरंजीव वेदांत पंकज नाले यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांचा वितरण समारंभ राज प्राथमिक विद्यालय, जळगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवव्याख्याते प्रा. सचिन देवरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मनसे जिल्हाध्यक्ष मुकुंद रोटे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रफुल्ल क्लासेस संचालक विकास निकम, तसेच निशा पिंपळे, सारिका पाटील, नीता वराडे आणि रेणू सोनवणे या मान्यवर व्यक्तींनी उपस्थिती लावली.
आदिवासी आश्रम शाळा, डोमगाव (ता. चोपडा, जि. जळगाव) येथे कार्यरत असलेले पदवीधर शिक्षक किशोर पंढरीनाथ पाटील यांना “गुणवंत शिक्षक पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. अशोक लाडवंजारी यांच्या हस्ते पदक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले.
किशोर पाटील हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजकल्याणासाठी सतत कार्यरत असून, त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
पुरस्कार मिळाल्याबद्दल किशोर पाटील यांच्यावर त्यांच्या स्नेही, मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम