कि.सो.क. न्यू सिटी हायस्कूलमध्ये ‘पर्यावरणपूरक गणेश मूर्ती’ कार्यशाळा संपन्न

बातमी शेअर करा...

कि.सो.क. न्यू सिटी हायस्कूलमध्ये ‘पर्यावरणपूरक गणेश मूर्ती’ कार्यशाळा संपन्न

 

जळगाव: जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी कि.सो.क. न्यू सिटी हायस्कूलमध्ये ‘पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती’ तयार करण्याची कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. या कार्यशाळेत ७५ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि शाडू मातीपासून आकर्षक गणेश मूर्ती तयार केल्या.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

विद्यालयाच्या कला मंडळ प्रमुख सौ. एस. एस. जोशी यांनी विद्यार्थ्यांना मूर्ती तयार करण्याचे मार्गदर्शन केले. तसेच, श्री जे. व्ही. जोशी आणि श्री डी. एम. बागुल यांनी कार्यशाळेत विशेष सहकार्य केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमधील शिल्पकला आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन मिळाले.

कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सुंदर मूर्त्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री व्ही. एन. हलकारे, उपमुख्याध्यापिका सौ. जया जोशी आणि पर्यवेक्षक श्री एस. व्ही. भामरे यांनी कौतुक केले. या विद्यार्थ्यांना लवकरच शाळेतर्फे बक्षिसे देऊन गौरवण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री युवराज करनकाळ आणि मानद सचिव श्री संतोष अग्रवाल यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

कार्यशाळेतील विजेते विद्यार्थी:

  • प्रथम क्रमांक: तेजस श्याम बागले, गौरव चौधरी
  • द्वितीय क्रमांक: स्वामी महाले, नक्ष सूर्यवंशी
  • तृतीय क्रमांक: हेरंब जोशी, क्रीतेश महाले
  • चतुर्थ क्रमांक: कृष्णा धनगर, मयंक सोनवणे
  • पंचम क्रमांक: दुर्गेश पाटील, हर्षल सुपनार, विराज सुपनार
  • उत्तेजनार्थ: हर्षल मिस्त्री, आर्यन गवळी, हिमांशू गुरव
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम