किनोद येथे विवाहितेचा गळफास ; खून झाल्याचा माहेरच्या मंडळींचा आरोप 

बातमी शेअर करा...

कीनोद येथे विवाहितेचा गळफास ; खून झाल्याचा माहेरच्या मंडळींचा आरोप 

जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव तालुक्यातील किनोद गावात २६ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. १ मे) रात्री उघडकीस आली. मात्र ही आत्महत्या नसून सासू व नणंदने गळा दाबून तिचा खून केल्याचा गंभीर आरोप मयत विवाहितेच्या माहेरच्यांकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयत विवाहितेची ओळख :
गायत्री ज्ञानेश्वर कोळी (वय २६, रा. किनोद, ता. जळगाव) असे मृत विवाहितेचे नाव असून ती आपल्या पती, सासू, नणंद व दोन मुलांसह वास्तव्याला होती. पती भाजीपाला विक्रीचे काम करतात, तर गायत्री शिवणकाम करून कुटुंबाला हातभार लावत होती.

घटनाक्रम :
गुरुवारी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास गायत्रीने राहत्या घरी गळफास घेतल्याचे सांगण्यात आले. ही माहिती मिळताच तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी घरातील पती, सासू आणि नणंद हे तिन्ही जण फरार झाले असल्याचे निदर्शनास आले.

माहेरच्यांचा संशय आणि आक्रोश :
गायत्रीच्या मृत्यूबाबत तिचे भाऊ सागर कोळी, बहीण प्रियांका कोळी व मावशी सुनीता कोळी यांनी आत्महत्येच्या मागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. त्यांच्या मते, घरगुती वादातून सासू व नणंदने मिळून तिचा गळा दाबून खून केला असावा.

पोलीस कारवाई आणि पुढील तपास :
गायत्रीला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यावेळी तिच्या नातेवाईकांनी शव ताब्यात घेण्यास नकार देत दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलनाचा इशारा दिला. जळगाव तालुका पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम