कुंभारीतील तरुणाची सासुरवाडीत आत्महत्या ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा...

कुंभारीतील तरुणाची सासुरवाडीत आत्महत्या ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

फत्तेपूर (ता. जामनेर) – कौटुंबिक कलहातून कुंभारी येथील बादल हवसू मंडाळे या तरुणाने पत्नी व सासरच्या मंडळींसोबत झालेल्या वादानंतर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ८ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बादल मंडाळे यांची पत्नी सिंदखेड लपाली (ता. मोताळा) येथे माहेरी गेली होती. ती गर्भवती असल्याने माहेरी राहत होती. दरम्यान, तिने गर्भपात केल्याची माहिती मिळाल्यानंतर बादल मंडाळे पत्नीला घेण्यासाठी सासुरवाडीत गेले. मात्र तेथे पोहोचल्यावर त्यांचा पत्नी व सासरच्या मंडळींसोबत वाद झाला. या वादातून त्यांनी विषारी औषध घेत आत्महत्या केली.

या प्रकरणी बादल मंडाळे यांच्या आई इंदुबाई चिंधू मुके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रुपाली बादल मंडाळे, संजय जयराम भंवर, लीलाबाई संजय भंवर व अक्षय संजय भंवर (सर्व रा. सिंदखेड लपाली) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल वरारकर करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम