
कुऱ्हा-काकोडा रस्त्यावर बसखाली वृद्धाचा मृत्यू
कुऱ्हा-काकोडा रस्त्यावर बसखाली वृद्धाचा मृत्यू
मुक्ताईनगर | तालुक्यातील कुऱ्हा-काकोडा रस्त्यावर बुधवारी (२४ सप्टेंबर) दुपारी चार वाजता झालेल्या भीषण अपघातात एका ८३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.
मृताचे नाव सुपडा निनू सोनवणे (रा. निमखेडी बुद्रुक) असे असून, ते बाजार करून पायी घरी परतत असताना (एमएच २० बीएल १७७०) क्रमांकाच्या भरधाव बसने त्यांना जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
सोनवणे हे पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडांसह कुटुंबासह राहत होते. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम